कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /-

आज कुडाळ तालुक्यातील आज मिळालेल्या अहवालानुसार शुक्रवारी दि.२ ऑक्टोबर रोजी १८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८८३ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी १८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. कुडाळ ५, रानबांबुळी २, ओरोस २, पिंगुळी २, बिबवणे १, वाडीवरवडे १, माणगांव १, पावशी ४ असे रुग्ण आढळले.तसेच तालुक्यात ३२९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २६३ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ६६ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..