कोल्हापूर /-
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण तापलं आहे. सुप्रिम कोर्टाची स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे.
सरकारवर दबाव आण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीने 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदला आपला पाठिंबा नसल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.
माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही, कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच, बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत.
या घोषणेला मराठा समाजाचा पाठिंबा नाही. अशी आंदोलने फायद्याची नसतात. महाराष्ट्र बंद करुन काही फायदा होईल का?
मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निकाल असतो, तो मान्य करावा लागतो.