वेंगुर्ले राष्ट्रवादी कडून हाथरस बलात्कार जाहीर निषेध..

वेंगुर्ले राष्ट्रवादी कडून हाथरस बलात्कार जाहीर निषेध..

वेंगुर्ले /-

उत्तरप्रदेशातील हाथरस येथील एका १९ वर्षीय तरूणीवर झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणाचा वेंगुर्ले राष्ट्रवादी कडून हाथरस बलात्कार जाहीर निषेध करण्यात आला आहे.उत्तरप्रदेशातील हाथरस बलात्कार हा लोकशाही ला काळीमा फासणारा राक्षसी प्रकार असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करून निर्दयपणे पाशवी अत्याचार करणारे नराधमांना कठोर कारवाई झालीच पाहीजे, असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर यांनी केले.

वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज या पाशवी अत्याचार प्रकरणाचा व अशा प्रवृत्तीचा पदाधिकारीनी काळ्या फीती लावून आणि कॅन्डल मार्च करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर,डाॅक्टर सेल जिल्हाध्यक्ष डाॅ.संजिव लिंगवत,जिल्हा चिटणीस मकरंद परब, बबन पडवळ,महिला शहराध्यक्षा सुप्रिया परब सुहास मांजरेकर,श्रध्दा साटेलकर शाम सुर्याजी,बावतिस डिसोझा आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..