कुडाळमधील गॅस पंप आचनक बंद केल्याने रिक्षा चालक व ईतर कार चालकांचे हाल..!

कुडाळमधील गॅस पंप आचनक बंद केल्याने रिक्षा चालक व ईतर कार चालकांचे हाल..!

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील गॅस पंप गेले आठ दिवस बंद असल्याने तालुक्यातील रिक्षा व्यावसायिक ,प्रायव्हेट कार व्यावसायिक ,टूरिस्ट व्यावसायिक अश्या सर्व वाहन चालकांचे गॅस मिळत नसल्याने हाल झाले आहेत.गेल्या शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२० पासून पिंगुळी धुरी टेम्ब येथील गॅस पंप हा बंद करण्यात आलेला आहे.संबंधित गॅस पंप चालकांना ग्राहकांनी पंप बंद का ठेवला ? अशी विचारणा केली असता त्यांनी गॅस संपला आहे असे सांगितले.मात्र त्या,नंतर पण गॅस भरण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना गॅस मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस पंप दोन आहेत एक कणकवली वागदे येथे तर दुसरा कुडाळ पिंगुळी येथील धुरी टेंम्ब येथे.पिंगुळी येथील गॅस पंप हा गेली आठ ,ते नऊ वर्षे लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे.मात्र असा अचानक तडका फडकी गॅस पंप बंद करण्याचा निर्णय गॅस पंप चालकांने घेतल्याने कुडाळ ,वेंगुर्ला ,सावंतवाडी, मालवण या तालुक्यातील ग्राहकांना गैरसोय निर्माण झाली आहे.लोकांना कुडाळ पिंगुळी येथील गॅस पंप सोईस्कर होता ,मात्र आता अचानक हा पंप बंद केल्याने रिक्षा व्यावसायिक मोठ्या संकटात आले आहेत. तसेच गॅस किट च्या कार गाड्या चालकांचे मोठे हाल झाले आहेत.गॅस पंप आचनक बंद झाल्याने गॅस किटचालक ८००/ते ९०० रिक्षा चालकांचे गॅस पंप अभावी नुकसान झाले आहे.गॅस पंप कधी सुरू होईल या प्रतीक्षेत रिक्षा चालक व ईतर ग्राहक आहेत.

अभिप्राय द्या..