कोल्हापूर /-

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं तीन महिन्याचं वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांनी आक्रमक होत येत्या ७ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले की, एक लाखावर एसटी कामगारांच्या एक महिन्याच्या पगारासाठी राज्य सरकार लवकरच निधी उपलब्ध करणार असून त्यासाठी या आठवड्यात बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने सात ऑक्टोबरपासून कर्मचारी संघटना आत्मक्लेश आंदोलन करणार होते. त्याच अनुषंगाने वार्ताहरांशी बोलताना पाटील म्हणाले, टाळेबंदी मुळे एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात गेलं आहे.

त्यामुळे उत्त्पन्न नसल्याने पगार करणे अवघड झाले आहे. राज्य सरकारने जून महिन्यापर्यंतच्या पगारासाठी साडे पाचशे कोटींची मदत केली. त्यातून सर्व कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात आला होता. आता मागील तीन महिन्यातील एक महिन्याचा पगार देण्यासाठी सरकार या आठवड्यात एसटी महामंडळाला मदत करेल.

तथापि, सतेज पाटील यांनी दिलेल्या या माहितीमुळे कर्मचारी वर्गाला दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कर्मचारी संघटना आत्मक्लेश आंदोलनाबद्दल काय निर्णय घेतात याची महिती समोर आली नाही. सलग काही महिने एसटी वाहतूक बंद होती, हे मान्य असले तरी अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या पूर्ण क्षमतेने एसटी सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तसेच माल वाहतुकीसारखे पर्याय सुद्धा एसटीने निवडले असून, त्याला सकारात्मक असा प्रतिसाद ही भेटत आहे. एसटीची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी कर्मचारी वर्ग झटत असताना त्यांनाच हक्काच्या वेतनापासून वंचित का ठेवले जात आहे, असा सवाल देखील विचारण्यात येत आहे.

दिवाळीपूर्वी रस्ते होणार चकाचक
पाटील यांनी सांगितलं की, कोल्हापुर शहरातील सर्व रस्ते दिवाळीपूर्वी चकचक करण्यात येतील. त्यासाठी चाळीस कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवे रस्ते करण्यासोबतच इतर सर्व रस्त्यांचे पॅच वर्क करण्यात येणार आहे. थेट पाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून ५३ पैकी ४९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page