कोल्हापूर /-
कौटुंबिक हिंसाचाराचा कार्यस्थळावर होणारा परिणाम या संदर्भात डिसेंबर 2019 पासून भारतामध्ये कौटुंबिक हिंसाचाराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. भारतातील वाहतूक क्षेत्रातील अनेक कामगार संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भयांनी कौटुंबिक हिंसाचाराच्या सर्वेक्षणासाठी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्भया परिक्रमेचे आयोजन करून महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांना भेटी देऊन चांद्यापासून बांधापर्यंत सर्व वाहतूक क्षेत्रातील महिला कामगारांच्या भेटी घेऊन त्यांच्या प्रश्नाचा अभ्यास केला. तसेच त्यांच्यासोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचार याबाबत विशेष कार्यशाळा घेऊन सर्वेक्षणाचा अहवाल पूर्ण केला .
संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भयांनी आठ हजार महिलांना भेटी देऊन ऑनलाईन प्रश्नावली भरून सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे .
एसटी महामंडळाच्या महिला कामगारां सोबतच संघटित ,असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ,मोलमजुरी करणाऱ्या ,धुणीभांडी करणाऱ्या ,तसेच आशा वर्कर्स ,अंगणवाडी वर्कर, नर्सेस, शिक्षिका ,उद्योग व्यवसाय करणाऱ्या सर्व महिलांना भेटून या सर्वेक्षणाबाबत माहिती एकत्रित करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा अहवाल सादर केलेला आहे.
दिनांक 29 सप्टेंबर 2020 रोजी या सर्वेक्षणाचा जागतिक पातळीवरील अहवाल प्रसिद्ध करण्यात आला .आयटीएफ चे जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी निर्भयांच्या कामाचे कौतूक करुन संघटनेची कौटुंबिक हिंसाचाराबाबतची भूमिका विशद केली.संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी पण या मिटींगमध्ये सहभाग नोंदविला.
राज्य महिला संघटक शीला नाईकवाडे यांचे सह शबाना मुलांनी ,अरुणा पाटील, प्रभा पुरी या
निर्भयांसह अनेक
निर्भयांनी या झुम मीटिंगमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भयांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या जागतिक पातळीवरील मिटींगमध्ये सहभागी मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कोल्हापूर विभागाच्या सक्रीय व धडाडीच्य निर्भया .सौ. राजश्री कुंभार संगीता बागडी सरिता भानुसे असराबाई गिरी प्रतीक्षा चौगुले आरती पाटील अश्विनी धमाल सीता गडकर संजीवनी जाधव किरण लोकरे या मिटींगमध्ये सहभागी झाल्या होत्या.