कणकवली /-

केंद्रात व उत्तरप्रदेशमध्ये भाजप सरकार असूनही तेथे महिला सुरक्षित नाहीत. उत्तरप्रदेश येथे एका दलित युवतीवर सामुदायिक अत्याचार करून तिच्यावर पोलिसांनीच परस्पर अंत्यसंस्कार केले. त्या युवतीवर झालेल्या अत्याचारानंतरही त्या युवतीच्या कुटूंबियांची परवड थांबली नाही. निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार थांबतील अशी अपेक्षा होती, पण भाजपा सरकार महिलांवरील हा अत्याचार थांबवू शकले नाही. महिलांवर होणाऱ्या सामुदायिक अत्याचाराच्या घटना येत्या काळात थांबवण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी सरकारकडून अंमलबजावणी होण्याची गरज असल्याचे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत यांनी सांगत भाजपाच्या केंद्र उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी वैदेही गुडेकर, माधवी दळवी, नगरसेविका मानसी मुंज, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, शिवसेना गटनेते सुशात नाईक, नगरसेवक कन्हया पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, योगेश मुंज, ललित घाडीगांवकर, वैभव मालंडकर, रमेश चव्हाण, राजू राणे, राजन म्हाडगुत, विलास गुडेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page