कुडाळ/-
वन्यजीव सप्ताहानिमित्त संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ च्या वतीने आँनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.वन्यजीव, पर्यावरण आणि जैवविविधता या विषयावर संबंधित क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
संत राऊळ महाराज महाविद्यालय ,कुडाळ चे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले , प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम. एन. जांभळे व प्राध्यापक डॉ.योगेश कोळी यांच्या एकत्रित झालेल्या बैठकीत हे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि.२/१०/२०२० पासुन ते ७/१०/२०२० असा कार्यक्रमांचा कालावधी असणार आहे. त्यामध्ये दि.२/१०/२०२० रोजी ‘उपजिवीकेचे संरक्षण, जैवविविधतेच्या माध्यमातून ‘ या विषयावर डॉ. राजेंद्र कुंभार बोलणार आहेत.तसेच ३/१०/२०२० ला ॲड. दयानंद स्टॅलिन हे ‘मानवजातीचे अस्तित्व टिकवण्यासाठी वेटलँडची भूमिका’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
शिवाय ४/१०/२०२० डॉ.अपर्णा वाटवे- ‘सडे महाराष्ट्राचा वारसा- असे चालेल का?’ , ५/१०/२०२० डॉ. एस. डी. डिसले- ‘वणवे आणि जैवविविधता संवर्धन’, ६/१०/२०२० श्री. पराग रांगणेकर-‘चतुराच्या जगात’ व ७/१०/२०२० डॉ. गिरीश पंजाबी- ‘तिलारी जैवविविधता’ या विषयावर बोलणार आहेत. एकंदरीत या संपूर्ण आठवड्याभरात पर्यावरण, जैवविविधता या संदर्भात अनेक नव्या गोष्टी एकायला मिळणार हे नक्की!!! तेव्हा जास्तीत जास्त निसर्ग प्रेमींनी या वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित आँनलाईन व्याख्यानमालेला हजर राहावे असे संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या ‘प्राणीशास्त्र विभाग व ‘निसर्ग कट्टा’ तर्फे आवाहन करण्यात येत आहे.