“उत्तरप्रदेश ” प्रकरणी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने निषेध.!

“उत्तरप्रदेश ” प्रकरणी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने निषेध.!

सावंतवाडी /-

उत्तर प्रदेश मध्ये एका युवतीवर झालेल्या अत्याचारीत मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबांना भेटायला जात असलेले राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अडवून ज्या प्रकारे वर्तणूक केली त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी निषेध केला आहे.

केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार हे हुकुमशाही सरकार असल्याचा आरोप त्यानी यावेळी केला आहे. लोकशाही संपवण्याचा प्रकार भाजप करत असून या सामूहिक बलात्कार प्रकरणाला उत्तर प्रदेश चे सरकार पाठींबा देत आहे.या भाजप सरकार विरोधात जिल्ह्यात रान पेटवणार असल्याचे पण यावेळी ते म्हणाले आहेत. भविष्यात भाजप सत्तेत येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

अभिप्राय द्या..