▪️युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश परब यांचा जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देत दिला ईशारा..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी , सिंधुदुर्ग.

वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात एमबीबीएस , एमडी डॉक्टर हे कायम स्वरुपी मिळण्याबाबत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश परब यांनी आज सोमवारी ३१ जुलै रोजी जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांची भेट घेत त्यांना लेखी निवेदन देत स्पेशालिस्ट डॉक्टर देण्या संदर्भात चर्चा केली.

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असून त्यात आरोग्य ही एक अशी सेवा आहे ज्याची सर्वांना नितांत गरज आहे.शासनाचे धरण याबाबत उदासीन आहे. जिल्ह्यात आज जिल्हा रुग्णालय नंतर एकूण चार उपजिल्हा रुग्णालय असून त्यातील एक शिरोडा उपजिल्हा रुग्णालय ज्यात दशक्रोशीतील ग्रामस्थ उपचारासाठी येत असून हॉस्पिटलची अवस्था आज दयनीय आहे. ना चांगले डॉक्टर ना चांगले सुसज्ज असलेली उपकरणे, त्यामुळे जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्या ऐवजी त्याच्या जीवाशी खेळले जाते.नाईलाजाने मग रुग्णाना गोवा बांबोळी येथे किवा अन्य ठिकाणी न्यावे लागते त्यात रुग्ण दगावतात.आज शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात एकही पर्मनंट डॉक्टर नाही.या रुग्णालयात ७ पदे मंजूर असून त्यातील ५ पदे कार्यरत आहेत,त्यात ४ वाटी १ बंधपत्रकामध्ये एकही डॉक्टर एमबीबीएस एमडी (MBBS MD नाही, तर याची जबाबदारी मात्र शासनाची नाही का? असे आपल्या निवेदन देत परब यांनी दिलेल्या निवेनातून म्हटले आहे.

आम्ही या अगोदर प्रशासनाला व आरोग्य विभागाला जाग येण्यासाठी अनेक वेळा आपल्याला विनंती केली.तसेच अनेक वेळा आंदोलन देखील केली गेली. तरी या उपजिल्हा रुग्णालयात आपल्याकडून दुर्लक्ष केले जाते.विनंती करून आपण आम्हाला लवकरात लवकर कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत ज्यामध्ये एमबीबीएस एमडी डॉक्टर, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ व स्पेशलिस्ट डॉक्टर असतील,ही आमची ही मागणी गेल्या दहा दिवसात पूर्ण करा अन्यथा युवक कॉंग्रेस येत्या 15 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामस्थांसहित शिरोडा उपजिल्हा रुग्णालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून प्रशासनाला जाब विचार व त्याला पूर्णत्व प्रशासन जबाबदार राहील असे सिद्धेश परब यांनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून सांगितले आहे.यावेळी श्री.परब यांच्या सोबत
श्री चंदन हाडकी उपसरपंच शिरोडा, श्री मयूर आरोलकर माजी उपसरपंच आरवली, श्री आनंद मसुरकर अध्यक्ष पंचायत समिती विभाग शिरोडा मतदार संघ, श्री वैभव मांजरेकर सदस्य शिरोडा काँग्रेस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page