कुडाळ /-
करोना प्रादुर्भाव रोकण्यासाठी कुडाळ नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन वारंवार जन जागृती करत आहेत तरी सुद्धा कुडाळ मध्ये मोठ्या प्रमाणात विनामास फिरणारे खुप लोक आहेत. त्या लोकांवर आज कुडाळ नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या कडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि आज कुडाळ शहरात विनामास्क फिरणाऱ्यांनडून नगरपंचायत व पोलीस यांनी संयुक्तीक कारवाई केली,यात 6800 (सहा हजार आठशे ) एवढा दंड जमा झाला.
या कारवाई दरम्यान कुडाळ नगरपंचायत कर्मचारी ,राकेश केसरकर, प्रविण कोरगावकर; केतन पवार, अनिश सावंत ,विनायक मांजरेकर उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासना मार्फत सागर शिंदे आणि चव्हाण होते कारवाई करत तसेच ट्राफिक पोलीस कडून शाम भगत, जे.के.घाडी, गायतोंडे होते उपस्थित होते.अश्या या पोलीस प्रशासन आणि कुडाळ नगर पंचायत यांच्या नियोजनाने जे विना मास्क लावता फिरणाऱ्याना चांगल्या प्रकारे चाप बसू शकतो,त्यामुळे थोडे फार का होईना कोरोनाचे संक्रमण हे कमी कारता येईल ,कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली ,कुडाळ नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांचे कुडाळ शहरातील जनतेतून कौतुक होताना दिसत आहे.
https://youtu.be/oV-JZS1H5eM