थरारक पाठलाग करुन खेड पोलीस स्टेशन हद्दीतील 59 लाख रू.दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी व त्याचे 2 साथीदार यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक..

थरारक पाठलाग करुन खेड पोलीस स्टेशन हद्दीतील 59 लाख रू.दरोडा प्रकरणी मुख्य आरोपी व त्याचे 2 साथीदार यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक..

खेड /-

33 लाख रू.चा मुद्देमाल जप्त…

दिनांक 16/09/2020 रोजी 2 किलो सोन्याचा व्यवहार करण्याच्या उद्देशाने कामाक्षी पेट्रोलपंपाच्या अलिकडे असणारे कच्च्या डांबरी रोडने कॅनॉलजवळ घेवून जावून आरोपी व त्याच्या साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन चाकू व सु­-याचा धाक दाखवून फिर्यादीकडे असलेले 59,00,000/- रुपये रोख रक्कम असलेली बॅग हिसकाूवन नेल्यामुळे खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.163/2020 भादवि कलम 395, 420, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हयामध्ये आतापर्यंत एकुण 09 आरोपी अटक करण्यात आलेले होते. मात्र मुख्य सुत्रधार व त्याचे दोन साथीदार गुन्हयातील रक्कमेसह फरार होते. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक- डॉ.श्री.मोहीत कुमार गर्ग, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सातारा, पुणे, कोल्हापूर, बेळगाव राज्य कर्नाटक या ठिकाणी आरोपीच्या शोधकामी कार्यरत होते.

दिनांक 01/10/2020 रोजी आरोपीत हा त्याचेकडील कारने गोव्याला जाणार असल्याची खात्रीशीर माहीती सदर पथकाला मिळाल्याने त्याप्रमाणे सापळा रचून थरारक पाठलाग करुन खेड दरोडयातील मुख्य आरोपी किशोर उर्फ पिंटया उर्फ बिहारी रघूनाथ पवार, वय 36, रा.हर्णै,ता.दापोली, जि.रत्नागिरी व त्याचे दोन साथीदार 1) सत्यवान जनार्दन साळूंखे, वय 29, रा.सर्वे, ता.श्रीवर्धन,जि.रायगड, 2) सचिन लहू जाधव, वय 30, मूळ रा.पानशेत, ता.हवेली, जि.पूणे सध्या रा.हर्णै, ता.दापोली, जि.रत्नागिरी यांना त्याचेकडील कारसह ताब्यात घेतले. आरोपींकडून 28,05,900/- रुपयांची रोख रक्कम व कार, मोबाईल असा एकूण 33,09,440/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.शिरीष सासने, पोलीस उप-निरीक्षक.श्री.विकास चव्हाण, पोलीस हवालदार- संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, राकेश बागुल, पोलीस नाईक- विजय आंबेकर, सागर साळवी, उत्तम सासवे, अमोल भोसले, दत्ता कांबळे, रमीज शेख, मपोहेकॉ अपूर्वा बापट यांनी केलेली आहे. तपास पथकाच्या चांगल्या कामगिरीबद्दल मा.पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित कुमार गर्ग तसेच मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..