▪️सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४० वा वर्धापनदिन १ जुलै रोजी साजरा होत आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आ प्रवीण दरेकर उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

बँकिंग सेवेच्या सर्व अद्ययावत सुविधा आपुलकीच्या सवेसह लाखो ग्राहकांना देत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विश्वास संपादन केला आहे. प्रत्येक दिवस स्पर्धेचा असूनही शेतकरी राजाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना, सवलतीच्या दरात कर्जे, शेती पुरक व व्यवसायासाठी मदत देण्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँक आज महाराष्ट्रात अव्वल स्थानी आहे. ग्राहकांशी असलेले वर्षांनुवर्षीचे ऋणानुबंधाचे नाते दृढ करीत ग्राहकांच्या साक्षीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ४१ वर्षात पदार्पण करत आहे. बँकेचा ४० वा वर्धापनदिन शनिवार १ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे संपन्न होत आहे.

या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ प्रवीण दरेकर, प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष आ जयंत पाटील, ठाणे जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास सहपरिवारा सह उपस्थित रहावे अशी विनंती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व बँकेचे सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page