कोल्हापूर /-

(भुदरगड) येथील सह्याद्री लाईव्ह चे संपादक नितीन बोटे यांना सरपंच सेवा संघ व जी डी राठोड फाउंडेशन यांच्याकडून कोविंड योद्धा पुरस्कार देण्यात आला. या वेळी डी.वाय.एस.पी शिवाजीराव जमदाडे यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे पी.एस.आय गजानन खेत्रे यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन र्सो .वसुमती देसाई यांनी केले. यानंतर प्रमुख उपस्थित पी.एस.आय. अरविंद गीते म्हणाले आज पर्यंत अनेक फाउंडेशन पाहिले पण सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य करणारे फाउंडेशन आज पहिल्यांदाच पहात आहे. आणि भविष्यात ही या फाउंडेशन कडून असेच कार्य समाजासाठी घडावे अशी आशा बाळगून या फाउंडेशनला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो.
यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधील भुदरगड तालुक्यातील सह्याद्री लाईव्ह चे संपादक नितीन बोटे यांना कोविंड योद्धा म्हणून पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील कोरोना काळातील कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या कोरोना प्रतिबंधक कार्याबाबत प्रसिध्दीसाठी, जनतेमधील कोरोना बाबत असणारा संभ्रम दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक जागृती त्यांनी केलेले प्रयत्न या सर्वांचा आढावा घेऊन सत्कार करण्यात आला आहे.
पत्रकार हे पत्रकारितेच्या या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात कायम कार्यरत असतात. ग्रामविकासात भरीव कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी, राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचा आढावा घेऊन यांना प्रसिद्धी माध्यमातून योगदान देतात यामुळे कोरोना काळात यांचे सहकार्य मोलाचे आहे व अशीच आपली भरभराट होवो. सदर आपले काम प्रेरणादायी आहे अशी माहिती सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील व राठोड फाउंडेशनच्या अध्यक्ष सुरेश राठोड (सर) यांनी पत्राद्वारे दिली.
नितीन बोटे यांना कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या पूरस्काराचे वितरण सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करत 30 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता राज्य राखीव बटालियन- 3, वाडीपीर, तालुका करवीर, कोल्हापूर येथे प्रमुख उपस्थित पी.एस.आय अरविंद गीते, संजय शिंदे, गजानन खेत्रे, अमर झीटे, सामाजिक कार्यकर्त्या वसुमती देसाई व दैनिक जनमत चे उपसंपादक सुरेश राठोड यांच्या उपस्थितीत शानदार समारंभात प्रधान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page