मालवण /-

ज्ञानदीप विद्यामंदिर वायंगणी हायस्कूलच्या जडणघडणीमध्ये श्रीमती रंजना कदम यांचे फार मोठे योगदान आहे शाळेतील विद्यार्थी सुसंस्कृत व सर्वांगाने एक जबाबदार नागरिक झाला पाहिजे या भावनेतून त्यांनी विद्यार्थ्यांवर अध्यापना बरोबरच चांगले संस्कार करण्याचे काम केले त्यामुळे त्या आदर्श शिक्षिकाच होत्या असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष सदानंद राणे यांनी सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभात बोलताना काढले श्रीमती रंजना मधुकर कदम या ज्ञानदीप माध्यमिक विद्या मंदिर वांयगणी या प्रशालेतून 30 सप्टेंबर रोजी आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या त्यावेळी शाळा व संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शुभेच्छा व सत्कार समारंभ श्री राणे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव वैभव जोशी ,शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत हडकर ,सदस्य दीपक सूर्वे, अनिल देसाई ,अशोक सावंत, हनुमंत प्रभू ,सत्कारमूर्ती श्रीमती रंजना कदम मुख्याध्यापक श्री टकले आदी मान्यवर उपस्थित होते .

शाळा व संस्थेच्या वतीने श्रीमती कदम यांना सन्मानपत्र व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रीमती कदम म्हणाल्या गेली पस्तीस वर्षे या विद्यालयात अध्यापन करताना संस्थाचालक व त्या त्या वेळचे मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन तसेच विद्यमान सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.आपल्या आई विषयी त्या म्हणाल्या वडिलांच्या पश्चात माझ्या आईने काबाडकष्ट करून आम्हा मुलांचं संगोपन करून शिक्षण दिले त्यामुळेच हे आताचे वैभव पाहता आलं अशी कृतज्ञता व्यक्त केली.सेवानिवृत्तीनंतरही शाळेसाठी कधीही सहकार्य करीनअशी ग्वायी दिली यावेळी चंद्रकांत हडकर, अशोक सावंत ,हनुमंत प्रभू ,आपसिंग वसावे, दयानंद आडे, संजय जाधव , पी. के. चौकेकर तसेच विद्यार्थ्यांमधून कु. विनिता सावंत व कु.मयुरी तोंडवळकर यांनी मनोगत व्यक्त करून श्रीमती कदम यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री टकले यांनी केले .
सूत्रसंचालन सौ प्रभा हळदणकर यांनी केले तर छाया कुणकवळेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page