✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.
महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वंदे भारत रेल्वेच्या शुभारंभाचा हा ऐतिहासिक क्षण देशाच्या प्रगतीला पूरक ठरणारा व या दोन राज्यांच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण केले केले आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा देणारी आणि पर्यटनाला गतिमान करणारी रेल्वेतील ही क्रांती आहे. पायाभूत सुविधांचं जाळं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे झपाट्याने निर्माण झालं, असे गौरवोद्गगार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. तर गोव्याचे मुख्यमंत्री डाॕ. प्रमोद सावंत म्हणाले,पर्यटकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांची लाईफ लाईन असलेली रेल्वे आणखी मजबूत झाली आहे. देशातील दळण वळणाची साधनं आणखी गतिमान झाली आहेत.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.
गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सवरून हिरवा झेंडा दाखवून वंदे भारत चा शुभारंभ करत, देशभरातील नागरिकांसाठी या आलिशान हायस्पीड ट्रेनचे लोकार्पण केले.
पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले,
आजचा दिवस महत्त्वाचा. प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधांचं जाळं झपाट्याने निर्माण झालं. येणाऱ्या पर्यटकांना सुखद आनंद मिळेल. विविध सोयींनी उपयुक्त असणारी आणि जलदगतिने येणारी ही ट्रेन प्रधानमंत्री नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वाखाली सुरु होतेय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पाहिलेलं स्वप्न साकार होत आहे. प्रत्येक पर्यटकाला याचा आनंद घेता येईल.
यावेळी गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी मडगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेतला. गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौटे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, कोकण रेल्वे चे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता गोवा व महाराष्ट्र राज्याचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोव्यातील नागरिकांनी या सोहळ्यात उस्फूर्त सहभाग घेतला.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वंदे भारतचे कणकवलीत जल्लोषी स्वागत
गोव्यातील मडगाव रेल्वे स्टेशन येथून निघालेली वंदे भारत ही ट्रेन कणकवली स्टेशनवर थांबली. पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे या ट्रेनमधून मडगाव येथून आले होते. कणकवली येथे त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह नागरिकांनी मोठ्या जल्लोषात वंदे भारत चे स्वागत केले. यानंतर ती मुंबईकडे रवाना झाली.
