कोल्हापूर /-
रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आ) चे पश्चिम महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर व कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे((दादा) यांच्या मार्गदनाखाली कबनूर ता.हातकणंगले येथे शिवनंदी या हाँल मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डाँ.रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष वाढविण्यासाठी व पक्ष बळकट करण्यासाठी युवा जिल्हाअध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित केला होता.यावेळी बोलत असताना अविनाश शिंदे म्हणाले दिन दलीत बहुजन समाज्यावरील अन्याय अत्याचार थांबवायचे असतील तर व अन्याय करणाऱ्या हरामखोराना ठेचायचे असेल तर ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षात सामील होऊन जसाच तसे उत्तर द्यायला हवे.रिपब्लिकन पक्ष हा गोरगरीब, मागासवर्गीय,शेतमजूर,कष्टकरी,दिनदूबळ्याच्या न्याय हक्कासाठी लढणारा असून देशामध्ये चाललेल्या अन्याय अत्याच्याराच्या विरोधात लढण्यासाठी युवा तरुणांची फळी उभी करणे काळाची गरज आहे.अन्याय अत्याचाराचा विरोधात तरुण पेटून उटला तर देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही.हे अन्याय अत्याच्यार थांबविण्यास हि आजची तरुण पिढी यशस्वी होईल यासाठी छ.शिवाजी महाराज,छ.शाहु महारज,महात्मा ज्योतिराव फुले,डाँ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विच्यारावर प्रेरीत होऊन गावागावा मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा काढा व सर्वच तरुणांनी रिपब्लिकन पक्षाशी संपर्क साधा,रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा खाद्यावर घ्या.आणी कामाला लावा.प्रत्येक अन्याय अत्याचाराशी लढण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.गावागावा मध्ये मात्र संघटन मजबूत करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेबांची ताकद वाढवा.त्याच बरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प.महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे व जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) हे हि तुमच्या सोबत अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी नेहमी तुमच्या सोबत असतील.
यावेळी रमेश कांबळे,प्रज्योक्त सुर्यवंशी,अमित शिंदे,सुशांत खाडे,अक्षय शेवाळे,सौरभ कानडे,प्रकाश कांबळे,अस्लम पेंढारी,अबूबकर इनामदार,इस्माइल नदाफ,दस्तगीर सनदी,स्वप्निल कांबळे,राहुल कांबळे,टिपू पाथरवट,अमन जमादार,सोहेल गुळेदगुड,आयन मुल्लाणी,आशिष कांबळे,यश कांबळे,अमोल कांबळे,दिग्विजय कांबळे,तुषार गवळी,रोहीत कोटावळे,सुरज गवळी,आकाश कांबळे,रणजीत कांबळे,विशाल कांबळे,सागर कांबळे,अनिकेत कांबळे,कुमार कांबळे,शाक्यानंद कांबळे,संतोष काळे,सुमिकेत कांबळे,प्रशिक माने यांच्यासह RPI चे युवा पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचलन प्रज्योक्त सुर्यवंशी यांनी केले तर आभार रमेश कांबळे यांनी मानले.