▪️राजकीय पक्षाची नेतेमंडळी ओसरगाव टोलनाक्याबाबत काय करतात याकडे जनतेचे लक्ष..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली.
ओसरगाव येथील टोल नाक्यावर सकाळी आठ वाजल्यापासून टोल वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. टोल वसुलीवेळी कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी ओसरगाव टोल नाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दरम्यान सकाळी दहा वाजल्यापासून विविध राजकीय पक्षाची नेतेमंडळी ओसरगाव टोल नाका येथे येणार आहेत.
त्यामुळे येथे आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. राजस्थान येथील कोरल असोसिएटला ओसरगाव टोल वसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. ९ जून रोजी याबाबतचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने कोरल एजन्सीला दिले. तर आज १४ जून पासून याची कार्यवाही सुरू झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून टोल वसुलीची कार्यवाही सुरू झाल्यानंतर टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.