✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.

पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे दिनांक १२ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती सदस्य सचिव तथा विभागीय उप आयुक्त महिला व बाल विकास पुणे संजय माने यांनी दिली आहे.

समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडयासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, या दृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी तसेच या महिलांना सुलभ मार्गदर्शन व्हावे, यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात येत आहे.

सदर महिला लोकशाही दिनाच्या दिवशी महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी / अडचणी यावर संबंधित विभागाचे अहवाल, त्याबद्दलचे नियम, शासनाची भुमिका यांचा विचार करून महिला लोकशाही दिनानंतर कमाल एक महिन्याच्या आत अर्जदाराला देणे, अशी तरतुद शासन निर्णयात केलेली आहे. विभागीय महिला लोकशाही दिनाचा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय कार्यालयात आयोजित करण्यात येतो. महिला लोकशाही दिनासाठी तक्रार व अडचणी अर्ज देण्याकरीता खालील निकष देण्यात आलेले आहे.

अर्ज विहित नमुन्यात असावा, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे, तक्रार अर्ज २ प्रतित असावा. उपरोक्त व्यतिरिक्त पुढील विषयांवरील तक्रार अर्जाचा महिला लोकशाही दिनाच्या दिवशी विचार करण्यात येणार नाही. व असे अर्ज सुध्दा स्वीकारले जाणार नाही. न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक व आस्थापनाविषयक बाबी. तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर.महिला लोकशाही दिनासाठी प्राप्त होणारे तक्रार अर्ज स्वीकारल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्या विभाग प्रमुखाकडे सदर तक्रार अर्ज पाठविण्यात येणार असून संबंधित विभाग प्रमुख हे सदर तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह महिला लोकशाही दिनाच्या दिवशी उपस्थित राहणार आहे. अर्जदारास महिला लोकशाही दिनानंतर कमाल एक महिन्याच्या आत अंतिम उत्तरे दिले जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत विहित नमुन्यातील अर्ज नसल्यास स्वीकारले जाणार नाहीत. पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिनासाठीचे तक्रार/निवेदन अर्ज विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास पुणे विभाग पुणे, पोलीस१२ आयुक्तालय शेजारी, 3 चर्च रोड, पुणे-४११००१. या पत्यावर स्वीकारण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page