सर्जेकोट गावातील तरुणांचा मनसेत प्रवेश..

सर्जेकोट गावातील तरुणांचा मनसेत प्रवेश..

मालवण /-

सर्जेकोटमधील आत्तापर्यंतच्या सर्व सत्ताधार्‍यांना कंटाळुन शिवसेनेला रामराम ठोकुन मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांवर प्रेरीत होऊन माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जेकोट गावातील तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, मनविसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, मनविसे तालुकाध्यक्ष विनायक गावडे, माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे, विभाग अध्यक्ष पिंगुळी सुंदर गावडे, महीला तालुकाध्यक्ष भारती वाघ, उपतालुकाध्यक्ष देवबाग राधिका गावडे यांच्या उपस्थितीत सर्जेकोट मधील ग्रामस्थ व तरुण कार्यकर्ते जनार्दन आजगावकर, दर्शन सावजी, वैभव आजगांवकर, वैभव करवडकर, अंकुश शेलटकर, अक्षय पाटील, गणेश कांदळगावकर, राहुल आडकर, साईल पराडकर, यश कोयंडे, विनायक परब, यश शेलटकर, चिन्मय पराडकर, अमेय सुर्वे, जयेश पराडकर, भावेश खडपकर, विशाल निकम, तुषार परब, ओंकार कवठकर, वृषभ आजगांवकर, राजेश केळुसकर, गोविंद सावजी, निहाल आडकर, रुपेश केळुसकर, नानु करवडकर आदी तरुणांनी मोठ्या संख्येने नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

अभिप्राय द्या..