कुडाळ /-
कुडाळ शहरातील सार्व.बांध. विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे बुजवा अन्यथा कुडाळ शहर भाजपच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करणार – राकेश कांदे यांनी दिला आहे.कुडाळ शहरातील सार्व.बांध. विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या
कुडाळ पोलिस स्टेशन ते हॉटेल आर.एस. एन. तसेच कुडाळ पोस्ट ऑफिस ते दत्तनगर रस्त्यावर बरेच खड्डे पडलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग ने आठ दिवसात खड्डे न बुजवील्यास ” लक्षवेधी आंदोलन “केले जाईल.या रस्त्याचे भूमिपूजन करुन एक वर्ष झाले निदान हा रस्तापूर्ण झाला नाही. परंतु खडीकरण केल्यानंतर वर्षात पुन्हा त्या सदर रस्त्याचे काम पूर्ण होण्या अगोदर त्या ठिकाणी खड्डे पडलेत . सार्वजनिक बांधकाम चे रस्ते पूर्ण होण्याअगोदरच खड्डे पडतात याला काय म्हणावे ? सदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवावेत शिवाय पोस्ट ऑफिस ते दत्तनगर रस्त्यावर वारंवार खड्डे बुजवण्यासाठी आजपर्यंत किती रुपये सार्वजनिक बांधकाम ने खर्च केले याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही घेणार आहोत .
तसेच एम.आय.डी.सी. ते राज हॉटेल हा एमआयडीसीच्या अखत्यारीत असणारा रस्ता हा मंजूर असून सदर ठेका रत्नागिरी येथील ठेकेदार श्री. सामंत कंट्रक्शनच्या नावावर आहे. सदर रस्ता कुडाळ एमआयडीसी पर्यंत करण्यात आला व पुढचा रस्ता काही कारणास्तव केलेला नाही तरी सदर रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले आहेत निदान केवळ जनतेसाठी नको आमदार, खासदार ,पालकमंत्री, त्या रस्त्यावरुन नेहमी जात येत असतात त्याचा त्यांना त्रास होतो .जनतेसाठी नको निदान त्यांच्याकरिता तरी सदर प्रशासनाने वेळीच ते खड्डे बुजवावे सदर खड्डे आठ दिवसात न बुजविल्यास कुडाळ शहर भाजपा लक्षवेधी आंदोलन करेल.असा ईशारा दिला आहे.