✍🏼लोकसंवाद /-मुंबई.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) निकालाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.बारावीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. दहावीचा निकाल उद्या म्हणजेच 1 जून 2023 शुक्रवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल. महाराष्ट्रातून 15,77,256 विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. ही परीक्षा राज्यभरातील 5033 परीक्षा केंद्रावर पार पडली होती. 2 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंत परीक्षा सुरू होती. परीक्षेला बसलेले उमेदवार mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page