✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस अशा विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) घेण्यात येणारी नीट प्रवेश परीक्षा रविवारी संपूर्ण देशात सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे पहिल्यांदाच या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एनटीएने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून कॉलेजमध्ये ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली.

एकूण 360 विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर हजर होते. बहुतांश विद्यार्थी हे पालकांसह परीक्षेला हजर होते त्यामुळे परीक्षा संपेपर्यंत पालक परीक्षा केंद्रावर बसून होते. या परीक्षेसाठी देशातील 18 लाख 72 हजार 341 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी साडे सतरा लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. देशातील एकूण 499 व परदेशातील 14 केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास न करता जिल्ह्यातच परीक्षा केंद्र उपलब्ध झाल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page