मसुरे /-
परब मराठा समाज मुंबईचे अध्यक्ष, कामगार नेते व माजी नगरसेवक स्व . श्री.जयवंत परब यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ ट्रस्ट सी. स. सावंत सभागृह गणेश चौक डी. एन. नगर. अंधेरी पश्चिम – मुंबई येथे सोशल डिस्टन्सिंग पाळुन सभेचे आयोजन केले आहे. तरी परब मराठा समाज मुंबई चे क्रियाशील कार्यकर्ते तसेच सलंग्न असलेल्या परब पतसंस्था ,बाल विकास व्यायाम शाळेचे कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन परब मराठा समाजाचे सरचिटणीस जी. एस. परब. यांनी केले आहे.