भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने वेंगुर्ला येथे उद्या ‘मच्छीमारांसाठी’ मार्गदर्शन कार्यक्रम

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने वेंगुर्ला येथे उद्या ‘मच्छीमारांसाठी’ मार्गदर्शन कार्यक्रम

वेंगुर्ला /-

भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग या अंतर्गत आत्मनिर्भर भारत संवाद अभियान राबविण्यात येत असून त्याचा आज शुभारंभ करण्यात आला आहे.मत्स्य शेतकरी, मच्छिमार,मत्स्य व्यावसायिक यांच्यासाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबाबत बुधवार ३० सप्टेंबर रोजी साई दरबार हॉल वेंगुर्ला येथे सायंकाळी ४ वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली व आत्मनिर्भर भारत संवाद अभियान जिल्हा संयोजक अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.यावेळी मच्छिमारांनी उपस्थित रहावे,असे आवाहन भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..