✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.

माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवगर्जना महानाट्याला जिल्हाभरातील शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान यापुढेही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील, असे आश्वासन देत युवा नेते विशाल परब हे उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला नतमस्तक झाले.

गेले तीन दिवस या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. हत्ती, घोडे, उंट यांच्या साक्षीने शिवराज्यभिषेकासह अफजल खान वध, पावनखिंड अशी अनेक ऐतिहासिक दाखले यावेळी सादर करण्यात आले. हा रोमांचकारी इतिहास पाहण्यासाठी जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान यापेक्षा ही भविष्यात मोठे कार्यक्रम आयोजित करुन जिल्ह्यातील लोकांचे मनोरंजन करण्यात येईल असे आश्वासन श्री. परब यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायाला दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page