✍🏼लोकसंवाद /- मालवण.

मालवण मसदे मार्गवर वेरळ माळरानावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे (सुमारे २५ कोटी किंमतचे) शुक्रवारी सायंकाळी जप्त केले. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधिक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभगाने व स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली आहे.दरम्यान, नऊ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेकडे चौकशी सुरू आहे. या कारवाईत दोन चारचाकी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटेनची माहिती वन विभागाला दिली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. मात्र या घटने गलबल रटाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page