✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.

मिलाग्रीस हायस्कूल येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व शुभेच्छापत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या दिनाप्रीत्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना प्रशालेचे मुख्याध्यापक मा. फा. रिचर्ड सालदान्हा यांनी स्त्रियांच्या समाजातील एकूणच योगदानाबाबत त्यांची भरभरून प्रशंसा केली. तसेच सर्वांनाच महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील विद्यार्थिनी प्रतिनिधींचा सुद्धा मुख्याध्यापकांच्या हस्ते गुलाब पुष्प व शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री दत्ताराम नाईक यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्री विजय इळकर सर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page