✍🏼लोकसंवाद /-सावंतवाडी संजय भाईप

जगातील सर्वोत्कृष्ट काजू बी( काजूगर ) म्हणून जी.आय.मानांकन मीळालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजूगराची कारखानदाराकडून होतेय अवहेलना.काजू बिला हमीभाव मीळावा पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी ली.व शेतकरी फळबागायतदार संघ सावंतवाडी,दोडामार्गचे अध्यक्ष विलास सावंत यांची मागणी केली आहे.

भारत देश हा क्रुषीप्रदान देश आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू,आंबा,सुपारी हि ऊत्पादने जिवनावश्यक ऊत्पादने नाहीत या कारणावर हमीभाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे. हे कारण म्हणजे कोकणातल्या शेतकर्यावर अन्याय केला जात आहे.काजू, आंब्याला विदेशात मोठी मागणी आहे.ही ऊत्पादने निर्यात होत असल्याने चलनामध्ये देशाला मोठा फायदा होतो. देशाच्या चलनामध्ये मोठा फायदा होत असेल तर या ऊत्पादनाना हमीभाव का नाही? वर्षभर शेतकर्याने शेती बागायतीमध्ये राबायचे आणि याचा फायदा व्यापारी आणि कारखानदाराना शेतकरी मात्र उपाशी अशी स्थीती कोकणातील शेतकर्यांची झाली आहे.

घाटमात्यावरच्या शेतकर्यांला सगळ्या योजनानचा लाभ त्यांच्या मालाला हमीभाव मिळतो.कोकणातील शेतकर्यांच्या मालाला हमीभाव का मीळत नाही. निसर्गाचा अनियमितपणे,जंगली प्राण्याकडुन शेती बागायतीची होणारी नूकसानी शासनाकडून कोणत्याही सहकार्याची अपेक्षा नाही अस असतानाही कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाही. म्हणून कोकणातील शेतकरी योजना हमीभावापासून वंचित.

या मुद्यावर आज सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी लि. व शेतकरी फळबागायतदार संघ सावंतवाडी- दोडामार्ग बांदा कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेमध्ये अध्यक्ष विलास सावंत यांनी बोलताना काजू बीला हमीभाव मीळावा जगातील सर्वोत्कृष्ट काजू बि म्हणून जी. आय. मानाकन मीळालेल असताना कारखानदाराकडून या काजू बि ( काजूगराची ) अवहेलना करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजूगरामध्ये आवश्यक प्रोटीन आहेत,दर्जेदार आहेत तर टोझानीया, बेनिन,साऊथ आफ्रीकेमधील काजू बिला शेगंदाण्या प्रमाणे घटकद्रव्य आहेत अस असताना या देशातील काजू बिला राणीचा मान आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अव्वल दर्जाच्या काजू बिला दासिचा मान का? कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग मध्ये मोठ्याप्रमाणात काजू बिच ऊत्पादन आहे काजू गराची निर्यात होत असताना कनिष्ठ दर्जाचा काजूगर बाहेरच्या देशातून आयात का केला जातो. आपल्या काजू गराच्या नावाखाली बाहेरच्या देशातला कमी दर्जाचा कमी किमतीत काजूगर आणून मोठा फायदा मीळवला जात आहे.काजू बागायतदाराची कारखानदार बैठक घेऊन दर का ठरवत नाहीत ? चार ते पाच वर्षापूर्वी काजू बि 180 ते 200 रूपये किमंतीने बि खरेदी केली जात होती. ऊलट दर वाढवायचा असताना दरामध्ये घसरण करून व्यापारी कारखानदार शेतकर्याच्या मालावर मोठा नफा मीळवत आहेत.मजुरी,पेट्रोल, फवारणीची औषध,खत यांच्या किमंती वाढल्या मग काजू बिच्या दरामध्ये घसरण का? शेतकर्याला काजू बि बाजारात विक्रीला आणेपर्यत 150 रूपया पेक्षा जास्त खर्च येतो. जर 200 रूपयापेक्षा जास्त दर मीळाल्यास शेतकर्याला थोडाफार नफा मीळु शकतो.

बाजारामध्ये डुपलीकेट काजूगर विक्रीला येत असल्याचे प्रकारही ऊघड होत आहेत. आफ्रीकेचा कमी दर्जाचा, कमी किमंतीचा काजूगर सिंधुदुर्गातील काजूगर म्हणून विकला जात आहे. चक्क धारावीच्या झोपडपट्टीमध्ये शेगदाण्याच्या पावडरीमध्ये थोडी काजूची पावडर टाकुन चाॅकलेट बनवली जातात तसे साचामध्ये काजूगर बनवले जातात आणि आपल्या काजूगराच्या नावाखाली विकुन ग्राहकांची फसवणूक केली जाते.सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये या सर्व बाबीचा उलघडा करून काजू बिला हमीभाव मीळण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page