सिंधुदुर्ग /-

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी कुडाळ तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आज सोमवार रोजी तहसीलदार कार्यालया वर धडक दिली.कुडाळ तालुक्यातील स्थानिक प्रशासन व मराठा समाजात झाली शाब्दिक बाचाबाची तर जिल्हा प्रशासनाने मराठा आंदोलनाकडे कानाडोळा केला म्हणून मराठा समाजाच्या वतीने तालुका व जिल्हा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 65%मराठा समाज राहतो आज आंदोलनाची निवेदन स्वीकारताना कसलंही व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार आमदार मराठा समाजाचे असताना मात्र जिल्हा प्रशासनाने मराठा समाजाला वाऱ्यावर सोडताना पहिला मिळत आहे,सकल मराठा समाजाच्या वतीने आज 23 हजार 107 लोकांनी सह्या करून निवेदन कुडाळ तहसीलदार फाटक यांना देण्यात आले निवेदन.जिल्हा प्रशासनाने मराठा आंदोलनाकडे गांभीर्याने पहावे नाहीतर मराठा समाजाने गांभीर्याने बघितलं तर जिल्हा पळता भुई होईल.मराठा क्रांती मोर्चा जिल्हा समनव्यक सुहास सवांत यांनी दिला इशारा लवकरच जिल्ह्यात मराठा समाज आक्रमकपणे पाहिला मिळणार अस ते बोलत होते.

यावेळी उपस्थित ऍड.सुहास सावंत, संग्राम सावंत, प्रभाकर सावंत, बंड्या सावंत, सुनिल सावंत, राजू राऊळ, सचिन काळप, शैलेश काळप, सुंदर सावंत, विजय सावंत, अभिषेक गावडे, वैभव जाधव, सचिन सावंत, शैलेश घोगळे, अमरसेंन सावंत, भाई साटम, श्याम सावंत, झेंडे, संजय लाड, प्रफुल्ल सुद्रीक, बंटी राऊळ, महाडदेव, इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page