✍🏼लोकसंवाद /- परुळे

स्क्च्छतेचा नवा पैटर्न परुळेबाजार गाव.कोकणातील हिवरेबाजार’ असे मत उपआयुक्त विकास कोकण भवन समिती यानी व्यक्त केले.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कोकण विभाग,स्तरीय समितीने नुकतेच परुळेबाज़ार ग्रामपंचायतीला भेट दिली व अभियानांतर्गत धन 2020/21 ते 2021/22 सालासाठी मुल्यमापन केले या समितीमध्ये उपायुक्त विकास कोकण भवन गिरिश भालेराव उपमुख्यकार्यकारी अधिकारी(ग्रापं) जि. प पालघर श्री जगताप विभागीय समन्वयक पुजा साळगावकर,शाखा अभियंता विठ्ठल लांबोर, सुदाम इंगळे,नितिन राणे यांचा समावेश होता यावेळी गटविकास अधिकारी मोहन भोई, कृषी अधिकारी विद्याधर सुतार, विस्तार अधिकारी श्री धुरी,सरपंच प्रणिती आंबडपालकर उपसरपंच संजय दुदवडकर,माजी सरपंच श्वेता चव्हाण,प्रदिपप्रभु सदस्य,प्राजन्ता पाटकर,अभय परुळेकर, सुनाद राऊळ,नमिता परुळेकर सीमा सावंत, तन्वी दुदवडकर,पुनम परुळेकर यांसह प्रसाद पाटकर,सुनील चव्हाण,सुधीर पेडणेकर,शंकर राठीवडेकर यांसह स्वच्छ भारत मिशन सिंधुदुर्गचे निलेश मठकर,प्रविण काणकेकर,संतोष पाटील संदिप पवार यांसह ग्रामस्थ, महीला, अंगणवाडी कर्मचारीआशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते प्रदिप प्रभु यांनी प्रास्तावीक केले. ग्रामसेवक शरद शिंदे यांनी समितीला अभिलेख सादर केले.

यावेळी समितीने ग्रामपंचायत गावामध्ये अनेक नाविण्यपूर्वक प्रकल्प केले. कापडी पिशव्या वैडीग मशीन सुपारीच्या पानापासून बनविलेले वस्तू, सुसज्ज व्यायामशाळा, रेण वॉटर हार्वेस्टींग, प्रकल्प,इको टूरिझम प्रोजेक्ट, काथ्या उद्योग प्रकल्प, सांडपाणी निर्मुलन प्रकल्प.शाळा बायोगंस, सुसज्ज वाचनालय, सुपारी विविध वस्तु, काथ्यापासून विविध वस्तु
यांची पाहणी केली. घनकचरा, सांडपाणी व्यवस्था, शौचालय,शोष खड्डे,आदी कामांची व शाळा, अंगणवाडी,यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.पुढील वाटचालीसशुभेच्छा दिल्या.ग्रा.पं. तिचे अभियानातील काम बघुन स्वच्छ सुंदर परुळेबाजार गाव सिंधुदुर्गाती हिवरेबाजार आहे असे मत व्यक्त केले.यावेळी सिंधुदुर्गतील नीरवडे व परुळे बाजार या दोन ग्रामपंचायत चे मूल्यमापन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page