सिंधुदुर्ग /-

कोरोनाच्या काळात सीआरझेड निश्चितीबाबतची जनसुनावणी वास्तविक रद्द झाली पाहिजे होती. मात्र तरीही ही जनसुनावणी घेत असताना शासनाच्या सीआरझेड प्रारूप आराखड्याचे अनुवाद हे मराठी मध्ये उपलब्ध झाले पाहिजे होते.तसेच हे मराठी अनुवाद तलाठी कार्यालय ग्रा.पं.कार्यालयात उपलब्ध करण्याची गरज होती.असे मत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सीआरझेड निश्चितीबाबतच्या ई जनसुनावणी दरम्यान व्यक्त केले.तसेच लोकांनी या आराखड्या बाबत ज्या हरकती घेतल्या आहेत त्याचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी असेही आ.वैभव नाईक यांनी सांगितले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीआरझेड निश्चितीबाबतची ई जनसुनावणी आज ओरोस जिल्हा नियोजनच्या सभागृहात पार पडली.यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,आमदार वैभव नाईक, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. या जनसुनावणी मध्ये आ.वैभव नाईक यांनी विविध हरकती मांडल्या.

आ.वैभव नाईक म्हणाले, मालवण येथील मरिन सेंच्युरीमुळे गेले अनेक वर्षे पारंपारिक मच्छिमारी करणाऱ्या मच्छीमारांना धोका निर्माण होणार आहे.तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाण्यासाठीही अडथळा होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित मरिन सेंच्युरीला आ.नाईक यांनी विरोध केला. त्याचप्रमाणे सीआरझेड संबंधित क्षेत्र हे त्याठिकाणच्या स्थानिक लोकांना कळण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन दाखवणे गरजेचे होते.

मालवण नगरपालिकेने लोकांनी व लोकप्रतिनिधिंनी मांडलेल्या हरकती नोंदविल्या आहेत.त्या हरकतींचा विचार आपल्या पुनर्रआराखड्या मध्ये करावा.तसेच आराखड्यामधील लोकांना घरबांधणीच्या परवानगी आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडेच ठेवाव्यात.जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही.तसेच जे पारंपारिक मच्छिमार ज्यांची घरे समुद्र किनाऱ्यावर आहेत त्यांचा विचार झालेला नाही त्याबाबत पुनर्रआराखड्या मध्ये त्यांचा विचार व्हावा असे मुद्दे आ. वैभव नाईक यांनी मांडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page