✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक-२०२३ च्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते वेंगुर्ला कॅम्प मैदान येथे करण्यात आला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण, कुडाळ व वेंगुर्ला यांच्यात सामने होऊन कुडाळ तालुका अंतिम स्पर्धेत पोहचला आहे.
वेंगुर्ले येथील या स्पर्धेचा बुधवारी दुसरा व अंतिम दिवस आहे. आज सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, मालवण, वेंगुर्ला या संघांमध्ये सामने रंगणार असून त्यातून महाविजेता व उपविजेता निवडला जाणार आहे. तसेच उत्कृष्ट सामनावीर, मालिकावीर, गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक व यष्टीरक्षक यांनाही महासंघाच्यावतीने चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भंडारी ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लाचे अध्यक्ष अॅड. श्याम गोडकर, सरचिटणीस प्रा. डॉ. आनंद बांदेकर, जिल्हा सरचिटणीस विकास वैद्य, क्रिकेट समिती प्रमुख बाबली वायंगणकर, जयराम वायंगणकर, राजू गवंडे, महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. संजय खडपकर, समिल जळवी, जयप्रकाश चमणकर, दिपक कोचरेकर, गजानन गोलतकर, श्रेया मांजरेकर, अंकिता बांदेकर, सदानंद केरकर, भरत आळवे, बाळ चोडणकर, चंद्रकांत वाडकर, अशोक नाईक, संतोष वैज, सत्यवान साटेलकर, विलास मांजरेकर, जया चुडनाईक, सारंग, म्हाडदळकर, गवंडे, भोवर, बबी कानडे यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.