कोल्हापूरातील सि पी आर रूग्णालयाच्या ट्राॅमा आय. सी यू .ला शाॅर्ट सक्रिटमूळे आग..

कोल्हापूरातील सि पी आर रूग्णालयाच्या ट्राॅमा आय. सी यू .ला शाॅर्ट सक्रिटमूळे आग..

कोल्हापूर /-

कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे ( cpr) रूग्णालयातील ट्राॅमा आ.य. सी.यू मधील एका कक्षामध्ये आज पहाटे चार वाजण्याच्या सूमारास इलेक्ट्रीक बोर्ङमध्ये शाॅर्ट सक्रिट झाल्याने आग लागली.ही आग तात्काळ आटोक्यात आणण्यास अग्नीशामक दलाला यश आले आहे.आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. अशी माहीती रूग्णालयाचे अधिक्षक ङाॅ. राहूल बङे यांनी दिली.आय.सी.यू मधील 15 रूग्णांना इतर कक्षात सूरक्षितरित्या हलविण्यात आले आहे.अजून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत. घटनेमध्ये दाखल केलेल्या रूग्णांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा दूखापत झाली नाही.सर्व वरिष्ठ ङाॅक्टर””नर्सिंगस्टाप””चतूर्थश्रेणी कर्मचारी स्टाप””महाराष्ट्र सूरक्षाबल जवान यांनी मदत केली.
घटनास्थळी जिल्हाधिकारी दाॅलत देसाई””अधिष्ठता ङाॅ.चंद्रकांत मस्के यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.

अभिप्राय द्या..