✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.
काविलकाटे येथील श्री.देव आंबा देवस्थानची वार्षिक जत्रोत्सव सालाबात प्रमाणे १२ फेब्रुवारी २०२३ रोजी बाळकृष्ण नगर कुडाळ कविलकाटे येथे आजोजित केली असून श्री देव आबा देवस्थानला दर्शन घेणे, नारळ ठेवणे,नवस फेडणे १२ फेब्रुवारी सकाळी ६ वाजल्यापासून सुरू राहील.तसेच यानिमित्त रात्रौ १० वाजता दत्तमाऊलीदशावतार नाट्यमंडळ यांचे महान पौराणीक नाटक “शेष|त्मज गणेश ” यांचा नाट्य रसिक यांनी लाभ घ्यावा असे आव्हान श्री .देव आबा देवस्थान यांच्याकडुन करण्यात आले आहे.