सर्व वैश बांधवानी रॅलीत सहभागी होण्याचे जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे तालुकाध्यक्ष रमेश बोद्रे यांचे आव्हान.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाजाच्या वतीने वैश्य समाज शतक मोहत्सवा निमित्ताने सावंतवाडीत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सावंतवाडी वैश्य समाजाला १०० वर्ष पुर्ण झाली या निमित्त शनिवार दिनांक ११-२-२३ रोजी सायंकाळी ३-०० वा मारुती मंदिर सलाईवाडा ते वैश्य भवन पर्यंत भव्य रैली निघणार आहे.रैली मध्ये सिंधू गर्जना ढोल पथक व नेरुर येथील चित्र रथ देखावे,असणार आहेत.या. कार्यक्रमास वैश्य भांधव मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत, तरी सर्व वैश बांधवानी या रैली मध्ये सहभागी होवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे आणि सावंतवाडी तालुका वैश्य समाज तालुका अध्यक्ष श्री. रमेश बोद्रे यांच्या वतीने करण्यात आले आहे.