कुडाळ /-
कुडाळ-परुळेकर गार्डन शेजारील रझिया अब्दुल्ला शेख ७० वर्षे या बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह काल सायंकाळी वेंगुर्ला तालुक्यातील कोरजाई-आनंदवाडी, जेटी जवळ खाडीमध्ये पाण्यावर तरंगताना मिळून आले, अशी माहिती निवति पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी दिली.कुडाळ येथील रझिया शेख या बेपत्ता असल्याची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात दिनांक २५ सप्टेंबर झाली होती. त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता. त्या दरम्यान त्यांचा मृतदेह खाडीत आढळून आला. पोलिसांनी तो मृतदेह त्यांचे जावई अख्तर हुसेन इद्रीसी राहणार परुळेकर गार्डन, रो हाऊस नंबर २, स्टेशन रोड, कुडाळ यांना दाखविला असता. त्यांनी या त्याच असल्याचे सांगितले. त्यामुळे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून निवती पोलीसांनी सदर मृतदेह परुळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणून शवविच्छेदनासाठी,वैद्यकीय अधिकारी श्री कोळी यांना कळविले. त्यांनतर कुडाळ पोलीस ठाणे येथे माहिती देऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी अधिक तपास श्री.गोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गोसावी तपास करीत आहेत.