सी.आर.झेड ऑनलाईन जनसुनावणी मध्ये बाधित तालुक्यातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे ;अमित सामंत

सी.आर.झेड ऑनलाईन जनसुनावणी मध्ये बाधित तालुक्यातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे ;अमित सामंत

कुडाळ /-

शासनामार्फत सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील सीआरझेड बाधित पाच तालुक्यातील जनसुनावणी सोमवार दिनांक २८/९/२०२० रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ.मालवण.देवगड. वेंगुर्ला. सावंतवाडी या तालुका पंचायत समिती सभागृहात तसेच
ओरोस सिंधूदूर्ग नगरी येथे जिल्हा नियोजनच्या नवीन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

सीआरझेड बाधित गावातील जागरूक नागरिकांनी जागरूक पणे आपल्या हरकती नोंदवाव्यात.सीआरझेड बाबत यापूर्वी चेन्नई येथील एका संस्थेने सर्वेक्षण करून नकाशे तयार केले आहेत. त्यात अनेक ञुटी आहेत. या ञुटी समितीच्या निदर्शनास आणून देण्याची हिच वेळ आहे.त्यासाठी जिल्ह्य़ातील जागरूक नागरिकांनी उद्याच्या जनसुनावणी मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हरकती नोंदवाव्यात असे आवाहन सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..