तालुकाध्यक्षपदी विष्णू धावडे,उपाध्यक्ष केदार सावंत,सचिवपदी सागर जोईल यांची निवड..
लोकसंवाद /- देवगड.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर, यांच्या अध्यक्षतेखाली देवगड येथे सभा पार पडली यादरम्यान देवगड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित कमिटीचे पुष्पहार घालून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यामध्ये तालुकाध्यक्ष – विष्णू धावडे,सचिव – सागर जोईल,उपाधक्ष – केदार सावंत,सह सचिव- गुरुप्रसाद मांजरेकर,खजिनदार – सुप्रेम सनये,सदस्य प्रसाद बागवे, राजेंद्र साटम,रत्नदीप कांबळे,विक्रम सनये,नागेश दुखंडे आदींचा समावेश आहे.यादरम्यान जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर,जिल्हा उपाध्यक्ष समील जळवी,सचिव शिरीष नाईक,खजिनदार संजना हळदीवे,सहखजिनदार संजय भाईप,जिल्हा कार्यकारणी सदस्य मिलिंद धुरी,आनंद कांडरकर,कणकवली सचिव रोहन पारकर उपस्थित होते.