कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहरासह तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना व ती करोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू झाला आहे या कर्फ्यूला नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक कणकवलीकर व कणकवली शहरातील विविध घटकांनी उस्फूर्त पाठिंबा देत हा जनता कर्फ्यू यशस्वी केला त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण नक्कीच यशस्वी होउ. कणकवलीत व्यापारी, नागरिक, विविध सामाजिक संस्था कणकवलीतील राजकीय नेते पदाधिकारी,नरपंचायतचे सर्व कर्मचारी सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडिया दिवसभर व्यवसाय करुण त्यावर आपली उपजीविका करणाऱ्या अशा लोकानी सुधा चटनी भाकरी खाऊ पण करोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूला साथ देऊ अशी भूमिका घेतली या सर्वांच्या सहकार्यामुळे जनता कर्फ्यू यशस्वी झाला.

कणकवलीतील व्यापारी यांचे कोरोना व लोकडाउन कालावधीत
गेल्या सहा महिन्यात आर्थिक नुकसान होउन सुधा जनता कर्फ्यू यशस्वी होण्याकरीता पुढाकार घेतला ह्या सर्वांचे राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रवादी नगरसेवक अबिद नाईक यांनी आभार मानले

त्याचबरोबर उद्या कर्फ्यू संपल्यानंतरही सर्व नागरिकांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असणाऱ्या सोशल डिस्टंग्सिंग, मास्क वापरणे, सैनिटायझर व साबनाने हाथ स्वच्छ ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.महत्वाचे म्हणजे या पुढील काळात जनतेच्या हितासाठी सर्व राजकीय मतभेद विसरुन असेच एकत्र आपण येऊ असे आवाहनही राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page