लोकसंवाद /- सिंधुदुर्ग.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विवाह करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता : आरोपीं तर्फे ॲड यतिश खानोलकर व ॲड वैभव चव्हाण यांनी पाहिले काम.आरोपींनी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस डिसेंबर २०१८ मध्ये पळवून नेल्याची फिर्याद कणकवली पोलीस स्थानकात देण्यात आली होती.या फिर्यादीच्या अनुषंगाने तपासा काम करत असताना पोलिसांनी जानेवारी २०२० मध्ये आरोपी क्र.१ मंगल पाटील, आरोपी क्र.२ राजाराम पाटील दोन्ही रा.कोल्हापूर यांना अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी अटक केली तसेच या प्रकरणी आरोपी क्र.३ सुधीर पवार व आरोपी क्र. ४ दिपक पवार दोन्ही रा.सातारा यांना अटक करण्यात आली होती. यातील आरोपी क्र.३ विरुद्ध अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची फिर्याद देण्यात आली होती. या कामी जिल्हा सत्र व विशेष न्यायालयात आरोपी क्र. १,२ व ४ विरुद्ध भा.द.वि कलम ३६३, ३६६A, व आरोपी क्र. ३ विरुद्ध भा.द.वि कलम ३७६(१), ३७६(३) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,५(j)(२) अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सदर कामी सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले होते. साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसेच आरोपी क्र.१, २ तर्फे ॲड वैभव चव्हाण व आरोपी क्र.३,४ तर्फे ॲड यतिश खानोलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. याकामी ॲड. कोमल काकतकर व ॲड. तानाजी पालव यांचे सहकार्य लाभले.