वेंगुर्ला /-


तालुक्यातील उभादांडा श्री गणपती मंदिरात आज मंगळवारी अंगारकी संकष्टी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

आज अंगारकी संकष्टी असल्याने सकाळपासून तालुक्यातून तसेच ग्रामीण भागातून केळी, नारळ ठेवणे, नवस फेडणे तसेच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. राज्यभर प्रसिद्धीस पावलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील या गणपतीच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा, गोवा, बेळगाव तसेच अन्य राज्यातून मोठया संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. या श्री गणपतीचा महिमा सर्वदूर पसरला असून धार्मिक कार्यक्रमांचे श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा तसेच ग्रामस्थांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येते.

वेंगुर्ला /-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page