वेंगुर्ला /-
तालुक्यातील मठ टाकयेवाडी येथे सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आंबा बागेत
आकस्मिक आग लागून आंबा कलमे जळून होरपळून नुकसान झाले आहे. येथील महादेव बाळाजी नाबर यांची आंबा कलमे या आगीत होरपळून मोठे नुकसान झाले आहे. ही आग लागल्याची माहिती मिळताच मठ ग्रा.पं.सरपंच रुपाली नाईक, सामाजिक कार्यकर्ते अजित नाईक, उत्तम सकपाळ, विष्णू गावडे, सुनिल गावडे, सचिन आईर, ऋशिकेश आईर, विनायक आईर आदीसह स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.तसेच वेंगुर्ले अग्निशमक बंब च्या मदतीने सायंकाळी
आग विझविण्यात आली. यावेळी तलाठी राहुल गवते, कोतवाल सुरेश मठकर यांनी पाहणी केली.