सिंधुदुर्ग /- लोकसंवाद.

दि.२५/०८/२०१६ रोजी कदंबा ट्रान्सपोर्ट वास्को राज्य गोवा या बसने २०-२५ प्रवासी वास्को गोवा ते सोलापूर असे जात असताना रात्री जेवणासाठी हॉटेल व्हिवा कोकण येथे कदंबा चालक बस मधून उतरत असताना २ ते ३ अज्ञात इसमांनी त्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याची फिर्याद देण्यात आली होती.सदर केसचे कामी आरोपी राजेश कृष्णा सावंत,राकेश कृष्णा सावंत,विनोद नामदेव तळेकर सर्व रा.माजगाव ता.सावंतवाडी यांना दि.२५/०८/२०१६ रोजी अटक करून ओरोस येथील मे.सत्र न्यायालयात भा. द. वि कलम ३५३, ३३२, ३२३,५०४,५०६,३४ अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.

याकामी सरकार पक्षाकडून एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले होते.मात्र साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती व संशयित आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मे.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.एस.जे.भारूका यांनी सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ॲड विवेक मांडकुलकर,ॲड. प्रणाली मोरे,ॲड.भुवनेश प्रभुखानोलकर,ॲड.प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page