लोकसंवाद /- कुडाळ.

कुडाळ तालक्यातील चेंदवण ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायात सदस्य निवडून आलेल्या सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांची चेंदवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या उपसरपंच निवड करते वेळी ०९ सदस्य आणि सरपंच वैभव चेंदवनकर उपस्थित होते.यावेळी नवनिर्वाचित सरपंच आणि उपस्थित ग्रामस्थांनी उपसरपंच पदी निवड झालेल्या सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांचे स्वागत केले.यावेळी भाजपचे रणजित देसाई ,कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष विनायक राणे,संदेश नाईक ,प्रशांत तेंडुलकर ,माझी सरपंच देवेंद्र नाईक,तसेच चेंदवन गावातील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.उपसरपंच पदी सौ.रश्मी देवेंद्र नाईक बिनविरोध निवड झाल्याबद्दल
सरपंच सदस्य ,आणि ग्रामस्थ यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page