लोकसंवाद /- कणकवली.

देवगड तालुक्यातील मणचे गावचे नवनिर्वाचित अपक्ष ग्रा.पं. सदस्य मन्सूर सोलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना नेते संदेश पारकर व युवा सेना जील्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात कणकवली विजय भवन येथील कार्यालयात प्रवेश केला. यावेळी देवगड तालुकाप्रमुख जयेश नर, युवा सेनेचे तालुकाप्रमुख फरिद काझी, गुरुनाथ मेस्त्री, दीपक तोरसकर, विष्णू घाडी, सुरेश घाडी, फयाज पावसकर, प्रकाश भेक्रे, संजय गुरव, फकीर मेस्त्री, असलम शिरगावकर, इर्शाद शिरगावकर आदि उपस्थित होते. दरम्यान ग्रा.पं. सदस्य मन्सूर सोलकर यांना श्री. पारकर व नाईक यांनी भगवी शाल घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page