लोकसंवाद /- देवगड.

देवगड येथील समुद्रात मच्छीमारी करत असताना पुण्यश्री या नौकेने अचानक पेट घेतला.ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. मात्र नौकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यश्री नौका शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी गेली होती. यावेळी सुमारे २२ वाव मध्ये ती गेली असतानाच अचानक नौकेला आग लागली. त्यावर असलेल्या मच्छीमारांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र नौके वरील आग नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी खोल समुद्रात उड्या घेत आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग तब्बल चार तासाच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी विझवली. नौकेवरील आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर दोन नौकांच्या सहाय्याने नौकेला देवगड बंदरात आणण्यासाठी इतर मच्छीमार बांधवांनी शर्तीचे प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळतात आजूबाजूतील मच्छीमार बांधव महेश सागवेकर, बापू सागवेकर, हितेश हरम, आकाश हरम बाबू वाडेकर,अक्षय हरम, चेतन पाटील नागेश परब, बाबू कदम आदींनी आग विझवण्यासाठी आटोकात प्रयत्न केले. नौकेला बंदरात आणल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत नौकेला किनाऱ्यावर आणण्यास शर्तीचे प्रयत्न केले. मात्र गणपत निकम यांच्या त्या नौकेचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page