वैभववाडी /-

आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे हे वैभववाडी दौऱ्यावर आले असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे वैभववाडी तालूका संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे आणि मनविसे उपजिल्हा अध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतीक बागवे, विजय सावंत, राघोबा पाटील सुभाष राणे, अरुण सुद, मिलिंद कदम, सदानंद पडवळ या युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश केला. त्यावेळी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, मनविसे अध्यक्ष श्री. अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, मनविसे प्रमुख संघटक श्री. यश सरदेसाई साहेब, श्री. प्रशांत कनोजिया साहेब आणि सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. अमोल साळुंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर मोरे यांनी श्री. राघोबा पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या विभाग अध्यक्ष पदी, मिलिंद कदम यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष श्री. अनिकेत तर्फे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page