सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील संस्थानकालीन इतिहासाची साक्ष देणारे तत्कालीन सावंतवाडीचे राजे बापूसाहेब व शिवराम भोसले यांच्या पुतळयाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे दुरावस्था झाली आहे.त्यामुळे त्या पुतळयाचे तात्काळ सुशोभीकरण करा, अशी मागणी सावंतवाडीचे ज्येष्ठ सुपुत्र अनिल परूळेकर यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे. तर सावंतवाडी संस्थानाने शहराला अनेक गोष्टी दिल्या. मात्र त्यांचे पुतळे आज फक्त सेल्फी पॉइंट बनले आहेत, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या पुतळयाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन श्री. जावडेकर यांच्याकडून देण्यात आले. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page