गल्ली पासून दिल्लीपर्यंत भाजपाचीच सत्ता आमदार नितेश राणे आपल्या विधानावर ठाम.
लोकसंवाद /- कणकवली.
भाजपाचे बिनविरोध सरपंच निवडून आलेत त्या गावच्या विकासासाठी 50 लाखांचा निधी मी देणारच आहे. भाजपाचे बिनविरोध सरपंच आलेल्या गावातील 50 लाखांच्या विकासकामांची यादीही माझ्याकडे येऊ लागली आहे. येत्या ग्रा पं निवडणुकीत भाजपाचा सरपंच द्या मी हवा तेवढा विकासनिधी देतो असे सांगत भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या ग्रा पं निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांशी केलेल्या संवादाचा पुनरुच्च केला. जिल्ह्यात राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. त्या राज्य आणि केंद्र सरकारचा विकासनिधी भाजपाच्याच माध्यमातन
निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांशी केलेल्या संवादाचा पुनरुच्चार केला. जिल्ह्यात राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचा विकासनिधी भाजपाच्याच माध्यमातून आणता येणे शक्य आहे. ग्रामस्थांना गावाच्या विकासकामांसाठी निधी यावा ही अपेक्षा असते. त्यामुळे नांदगाव मध्ये ग्रा पं प्रचार कार्यालय उदघाटन वेळी मी सांगितलेला मुद्दा योग्य होता. मतदारांशी संवाद साधताना विकासकामांबद्दल बोलताना काही गोष्टींची जाणीव करून देणे गरजेचे असते. कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी माझे अतूट नाते आहे. 2014 मध्ये 26 हजारांनी तर 2019 मध्ये 80 हजारांच्या लीड ने मी जिंकून आलो आहे. त्यामुळे माझ्या आणि मतदारांच्या नात्यात कोणी लुडबुड करू नये. माझ्यामुळे विरोधकांना पत्रकार परिषद घेण्याची संधी मिळत असेल, आपल्या मालकाला खुश ठेवता येत असेल तर त्यात मला आनंद आहे असा टोलाही आमदार नितेश राणे यांनी विरोधकांना लगावला.
ग्रामविकास मंत्रालयचे मंत्री भाजपाचे नेते गिरीश महाजन आहेत. गावात राज्यमार्ग करायचे असतील तर बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपाचे आहेत. गावात किराणा किंवा धान्य दुकान चा विषय असेल तर मंत्री रवींद्र चव्हाण आहेत. गावच्या विकासासाठी निधी द्यायचा असेल तर अर्थमंत्री महत्वाचे असतात. राज्याचे अर्थमंत्री भाजपाचे नेते आहेत. पनवेल नंतर संपूर्ण कोकणात भाजपाचा मी एकमेव आमदार आहे. मी कोकणात भाजपाचा एकमेव आमदार असल्याने मी भाजपाचा लाडका नाही काय ? माझ्या एका मागणीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी कणकवली नगरपंचायत ला 22 कोटींचा निधी दिला आहे.मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीयमंत्री राणेंचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे केंद्रीयमंत्री राणेंच्या आमदार असलेल्या मुलाचा विकासनिधी साठीचा शब्द मुख्यमंत्री डावलतील काय ? असा प्रश्नही नितेश यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांच्या काळात कणकवली विधानसभा मतदारसंघावर सतत अन्याय केला. साकव कामांची यादी डावलली जायची, विकासकामांची दिलेली यादी बदलली जायची. तेव्हा उपरकर आणि वैभव नाईक यांना वाईट वाटले नाही.आता त्यांचेच औषध विरोधकांना मिळतेय तर दुख लागलंय अशी टिकाही नितेश यांनी केली.
